आई...
आई...
तुझ्या आठवणींची पुटं,
माझ्या मनावर दाट.
आलो चालत स्वप्नवाट,
नेत्री पाणीयाचे लोट
सारा सागर जरी आटला,
नाही पान्हा तुझा तुटला.
वनवा दु:कालाचा पेटला
नाही झरा मायेचा आटला.
किती उपावशीले तू पोटाला,
घास मोतियाचा मज भरवला.
ठिगळं नेसूच्या लुगड्याला,
परी जपले तू मज लेकराला .
आईsss किती आठवू...
तुझ्या त्यागाचं हे देणं,
दिसला मज सुवर्णाचा दिन.
परी आज पोरके हे मन,
सुने सुने सारे रीते तुजविन.
आता मोकलून धाय,
तू कधीच परतणार नाय.
टेकवाया माथा आता,
ना दिसणार तव पाय.
ना दिसणार तव पाय
