आई
आई
1 min
174
आई माझा गुरु
आई कल्पतरू
आईची माया
कशी मी विसरू
वटवृक्षासारखी दिली छाया
चंदनासारखी झिजवली काया
अशीही माऊलीची अगाध माया
नाही जाईल कधीही वाया
दिले आम्हा सुसंस्कार
शिकविले करावया आदर
अशा माऊलीचा धरुनी पदर
झाले आव्हानांना सदर
अशी माझी माऊली
आहे मायेची सावली
तिची आहे मी आजन्म ऋणी
मानते आभार मी तिचे मनोमनी
