STORYMIRROR

Mala Malsamindr

Others

3  

Mala Malsamindr

Others

आई

आई

1 min
11.4K

 मग तिच्यात कुठून बळ राहते

बाळाला घेऊनी माय जाते वावरात कामाला

 उन्हाचा चटका सोसत-सोसत तिच्या अंगाला 

राब - राब राबून तिची काया डांबर झाली


 भुकेची कळ सोसत पान्हा बाळाला पाजत गेली

 पाजून - पाजून तिचा पान्हाही आटत गेला 

कालची माय झाली आहे आजची आई 

सर्वजन ऐका तिची पण कहानी बाई 


 राब - राब राबते सर्वांना जेऊ खाऊ घालते 

उरलंसुरलं खाते बाळले पाजाय कुठून पान्हा फुटते 

उशिरा निजते भल्या पहाट उठून कामाले जूपते

 कालची आई झाली आहे आजची मम्मी


 बीखरून गेली नाती जपत ती मोडूनी कना

चेंगरत आहेत ती घर आणि ऑफिस मध्ये

 दिवसभर पान्हा फुटते पण जवळ बाळ कुठे असते 

मग बाळाची आठवण काढून पान्हा पण आटते


 कालची मम्मी ही आजची झाली आहे मम्मा

 भाजी गाडीतच निसुंन बाकी सर्व कामे आटपते 

आणि रात्री तिला लगेच नकळत डोळा लागते

 तिच्या स्तनांची चुखून-चुखून बाळ पापडी करते 


ती सगळी कडून चेपून - चेपून जाते 

  मग तिच्यात कुठून बळ राहते.


Rate this content
Log in