STORYMIRROR

Kirti Borkar

Others

3  

Kirti Borkar

Others

आई

आई

1 min
214

माया मिळते आईची

छान जशी उबदार

तिच्या हातून मिळते

अन्न आम्हा चवदार


तिच्याविना लाड माझं

कुणी पुरवत नाही

लेकरांशिवाय आई

जीव करमत नाही


आई करी हट्ट पुरे

पकडून घेई थोडे

जादूगार आहे मोठी

सर्व ताण दूर पळे


साहित्याला गुण द्या
लॉग इन