आई
आई
1 min
260
एक कविता करावी आईवर
एक कविता करावी आईवर
शब्द शब्द पिरुनी माळ साजेशी
अपर्ण करतो आईच्या चरणाशी
मला मिळावी थाप कौतुकाची
वाचकाच्या सुंदर प्रेमाची !
एक कविता करावी आईवर
एक कविता करावी आईवर
यमक यावे जुळून मधुर
चरण व्हावे सुमधुर
फुलांनी सजवावे शब्दाला
श्याम रंग मिळावा ओळीला !
एक कविता करावी आईवर
एक कविता करावी आईवर
द्यावा आनंद आईला ओजळीभर
त्यागाचा, कष्टाचा, उल्लेख पानभर
शीर्षक असावे आईचे
चित्र सुद्धा आईचे !
एक कविता करावी आईवर
एक कविता करावी आईवर
आई , मी तुझा बालकृष्ण
भूमिका माझी तुला समर्पण
ओळखतील या कवीला
रचलेल्या तुझावरच्या कवितेला !
