आई
आई
1 min
200
आई देव रूप माझी
सार्या लेकराची माय
किती थकली भागली
दुधावरची ती साय
आई देव रूप माझी
आहे सुखाची ती खान
जगी भुकेलेल्या साठी
तिला दुःखाची रे जाण
आई देव रूप माझी
सोसीयले खुप ताप
सुखी संसार ठेवण्या
तिला व्हावे लागे बाप
ऊन सावलीचा खेळ
काया कधी ना झिजली
चिंब चिंब पावसात
नाही कधीच भिजली
आईच्या सुंदर छायेत
भासे मोकळे आकाश
दाखविला तीने मला
जगी सुंदर प्रकाश
