आई तुला काय पाहिजे?
आई तुला काय पाहिजे?
1 min
217
माग आई तुला काय पाहिजे
जे जे आहे माझ्याकडे
अर्पण ते ते तुझ्या चरणात
कळा सोसून जन्म तू दिला मला
नजारा या विश्वाचा तूच दाखविला....
जिवापलीकडे सांभाळ केला
संस्कारचा काडा पाजला
शिकविले तूच
तूच घडविले मला....
सत्याचा मार्ग दाखवत
घाडवणीचा विडा माझा तूच उचलला
शिकवला खरेपणा शिकवली माणुसकी
कृतज्ञता ,कर्तव्यदक्ष,चांगुलपणाचे दिले धडे
आयुष्य माझे तुझेच देणे
सांग आई तुला काय हवे...
उपकार तुझे कैसे फेडू
सेवेचा तुझ्या लाभ दे मला
दुसरे तुझ्याकडचे काही नको मला
इतके दिवस देत आलीस
तेच प्रेम जन्मभर दे मला...
