आई तुझे रूप
आई तुझे रूप
1 min
168
आईमुळे मला
जग हे दिसले
तिने हो संस्कार
जीवनाचे दिले
गोड गीत गाते
बाळा निजविते
लाडिकपणाने
तीच गोंजारते
उपकार तुझे
नाही फिटणार
कधी तो आधार
नाही सुटणार
बोल तिचे असे
संताचीच वाणी
वाळवंटातील
जसे गार पाणी
आई तुझे रूप
आहे देवतेचे
तुझ्याकडे आहे
ज्ञान ममतेचे
सदा मी हृदयात
माता ही पूजली
सेवा हो तिची
मनोभावे केली
