आई थोर तुझी पुण्याई
आई थोर तुझी पुण्याई
1 min
262
मातेवीण या जगात साऱ्या
दैवत दुसरे नाही
थोर तुझी पुण्याई
आई ,थोर तुझी पुण्याई।।
तुझ्याविणा दिन भासे सुना
तूच आमची चेतना
ईश कृपेने तुझ्याच पोटी
जन्म लाभूदे पुन्हा ।।
तुझ्या कृपेने आम्हा लाभली
सौख्याची आमराई
थोर तुझी पुण्याई
आई ,थोरे तूझी पुण्याई ।।
उदंड लाभो आयुष्य तुजला
हीच करू प्रार्थना
नूरवी पुरवी मनोकामना
देवा श्री गजानना ।।
मला कळेना तव उपकारातुनी
होऊ कशी उतराई
थोर तुझी पुण्याई
आई थोर तूझी पुण्याई. ।।
