आई नावाचं झाड
आई नावाचं झाड
1 min
243
वर्षोंगणती कडक उन्हाचे
चटके तू पेलले
वर्षोगणती अतिवृष्टीचे
फटके तू झेलले
उघड्या बोडक्या माळरानी
काटे तुज टोचले
शरीरास टोचले परि ते
अंतरीच बोचले
तूफानातील ज्योतीसम पण
तेवत तू राहिली
घास भरवुनी आम्हा,
दृष्टीने जेवत तू राहिली
तू गेली अन् मज वेड्याला
गोष्ट एक उमगली
जगी तयाचे काहीच नुरले
ज्यास नसे माऊली
