STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

आई म्हणजे काय असते ?

आई म्हणजे काय असते ?

1 min
750

 आई  


आई म्हणजे काय असते ? 


आई म्हणजे काय असते ?

आई म्हणजे आई असते 

साऱ्या जगाची माई असते 


हसणाऱ्यांच्या सुखात असते 

रडणाऱ्याच्या दुःखात असते 

पळणाऱ्यांच्या पायात असते

उडणाऱ्यांच्या पंखात असते

जगात आई सर्वत्र असते


आई म्हणजे काय असते ?

कापसाची मऊ रुई असते 


पोटाला चिमटा देऊन 

बाळाचे पोट भरविते 

स्वतः दुःखात राहूनी 

इतरांचे मोट चालविते 

सर्वांना जागविणारी 

ती आईच असते


आई म्हणजे काय असते ? 

औषधाने भरलेली सुई असते. 


आई म्हणजे काय असते ?

थंडगार पाण्याची सूरई असते


आई म्हणजे काय असते ?

मंजुळ गाण्याची सनई असते


आई म्हणजे काय असते ?

थंड दुधावरची मलई असते



Rate this content
Log in