आई माझ्यासाठी...
आई माझ्यासाठी...
आई असू दे की अम्मा अथवा असेल ती कोणाची ममा ,
पण असते ती आपल्यासाठी प्रेमाचा निरंतर साठा ना कधीही फुटणारा..
तीच असते पहिली गुरू ,
जीची शिकवणी अगदी असते शेवटपर्यंत सुरू....
आपला गाईड नेहेमी सोबत असणारा ..
कुठल्याही समस्येवर तोडगा नक्की देणारा....
तिच्या कुशीत शिरायला ना वेळ काळाचे लागते बंधन ..
तिच्या मार्गदर्शनाने ने सोपे होते जीवन...
माझे सगळे दुःख झाले आता तिचे...
मी म्हणजे विश्वच जणू तिचे...
नाते हे आगळे वेगळे ...
परमवश्वराने खास आपल्या साठीच निर्माण केलेले ....
आहे ती खूपच संवेदनशील ...
जिचे प्रेम हे अनमोल ...
कठोरता जिच्या जवळ अजिबातच नाही ...
कधीच कुठली अधिकारशाही नाही ...
आम्ही मुले तिचा जीव की प्राण ...
आणि सगळी नातवंडे आहेत तिची शान ...
या जन्मात जरी गेलीस सोडून लवकर..
जन्मोजन्मी तुलाच करेल तुला माझी आई तो ईश्वर ...
नसते तिला आमच्याकडून कशाचीही आस ...
सगळ्यात शेवटी जिच्या उदरात जातो अन्नाचा घास ...
ह्या जन्मी जरी तू लवकर गेलीस सोडूनी...
पुढच्या जन्मी तरी देवाने करावी याची भरपाई ...
प्रेम आणि माया याचा सागर होतीस तू ...
प्रत्येक क्षणी मी कशी जगतेय तुझ्याविना हे समजू शकतेस ना ग तू ...
प्रत्येक गोष्टीत असतो तुझाच वास...
घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात होतो तुझाच भास...
अशी माझी आई होती...
माझ्यासाठी माझी ती सर्वस्व होती...
तिची महती वर्णावया शब्दच ना पुरे...
तिच्यासाठी सारे आयुष्यही माझे अपुरे...
