आई माझी ओळख...
आई माझी ओळख...
आई तू आहेस माझा जगण्याचा श्वास
मी तुझा कायम तेवता, ज्वलंत जागर
एकमेकांचा आपण आहोत एक विश्वास
आई तू आहेस माझा निस्वार्थ सागर
माझ्यावरच्या रागात तुझा असतो निवास
सोबत माझ्या तुझी असते प्रेमळ छाया
प्रेमात तुझ्या कधी असतो मायाळू धाक
काळजी माझी तुझी असते अपार माया
कुशीत तुझ्या भेटते लडिवाळ मायेची उब
पदरात तुझ्या मी असण्याचा आहे मान
मनात माझ्या धगधगते तुझीच ज्वाळा
हास्यात तुझ्या माझी दौलतीची शान
धाव असते तुझी माझ्या दुःखाच्या हाकेत
तू कायम आहेस स्त्रीराज्य माझ्या मनाचं
आनंदाश्रू दाटतात तुझे माझ्या लढाईत
तुझं तिथं असणं चांदणं माझ्या सुखाचं
तू आहेस माझी खरी वास्तविक ओळख
सर्वांसोबत तुझं असणं, साकार आयुष्य
मी तुझी जरी असले ना गं आधारशीला
तुझ्याच रूपात दिसतं माझं उज्वल भविष्य
तू आहेस माझे आपत्कालीन ऋणी छत्र
तू आहेस माझा अजेय निस्वार्थ स्वर्ग
मी तुझा अखंड असले जरी बहुमान
फक्त तूच आहेस माझे इच्छित सर्वस्व
