आई कुठे काय करते
आई कुठे काय करते
1 min
7
आद्य गुरू होऊनी
सर्वांची मनही जपते
सर्व करून मतलबी म्हणती
आई कुठे काय करते
आवडी निवडी मोलकरीन
होऊनी घरची सर्वांना
समजून घेत सून मुलगी
दोन घराची शिस्त जपताना
विठू माऊली सम
युग्ये अठ्ठावीस
घरासाठी उभी आयुष्य भर
तत्पर हमखास
ज्यांना उपकाराची
परतफेड न करायची
तेच लबाड म्हनंती
आई कुठे काय करायची
जेव्हा होशील पालक
आई-वडील तेव्हाच
कळेल वेळ निघून जाता
बोंबा मारल्या उगाच
