आई ईश्वरी वरदान
आई ईश्वरी वरदान
इडा पिडा टळो, म्हणूनी फुंकर घाली आई!
बालकांच्या ह्रदयांती, वसते ईश्वरी आई!!1
आईच्या दुधाची सर,जगती नाही कशाला!
मातृप्रेम चंद्र मिरवितो,साऱ्या ब्रम्हांडाला!!2
प्रेम वात्सल्य देतां, ती जीवनकळ्या फुलवी!
थोर उपकार आईचे,तिच जगां शिकवी!!3
ठेच लागता आठवे,शब्द,आईचेची कसे !
बाळांला छातीशी धरता,पान्हा फुटते कसे!!4
नाही कुराणी,रामायणाती,ना बायबलात!
स्वर्गाचे सुख मिळते,फक्त आईच्या पायात!!5
ब्रम्हां,विष्णु,शंकर,आईपुढे बालके होती!
आई संस्कार घडविता,दत्त झाले जगती!!6
आई ईश्वरी वरदान, कलीयुगी जगण्या!
आनंदांचा मधाळ ठेवा,दु:खी जगी राहण्या!!7
आईची ममता लाभली,जगी धन्य जाहला!
छत्र तिचे नाही ज्याला,जगी भिकारी ठरला!!8
आईपरि दैवत नाही,साऱ्या जगतावरी!
देव तिच्या रूपे ,भेटतो इथे तो पृथ्वीवरी!!9
हसता माऊली,प्रकाश जीवनी प्रकटतो!
वात्सल्य स्पर्शांचा भास,मनांला सुखांचा,होतो!10
वाट कष्टांची,जीवनांची परिमळे वेढली!
परिसांपरि स्पर्शाने, सुवर्ण झळाळी आली!!11
सदा औक्षण, जिव्हाळा, प्रेम झरा आनंदांचा!
ठेवा अमृताचा भरे,तृप्तीने समाधानांचा!!12
मातेच्या ह्रदयांचे गाणे,पुत्रां ओठी खेळते!
कवी लिहु ना शके,काव्य मातेपरि कोणते !!13
