आहे वेळ मौल्यवान
आहे वेळ मौल्यवान
आहे वेळेला ही किंमत, कधी रिकामा राहु नको!
गुटखा खाणे, पिण्यास दारू,छंद, असे तू करू नको...
भटकत बाईमागे वेडा,छंदी फंदी राहु नको!
फुकाचे नाद करीत फालतु,इकडे तिकडे फिरू नको!
प्रसंग समजुन रहावे जगी,पोरकटपणा,करू नको !
नादानपणे तुझी जिंदगी,भलत्या कामी,खर्चु नको !
आयुष्य बिनकामी,खर्चु नको,
वेड्यापरि तू,वागु नको !
हुंड्यासाठी, तू भांडु नको,
पत्नीला,त्रास देऊ नको !
बायको असे, घरची लक्ष्मी,ध्यानातूनी,सोडु नको !!1
व्यसनांनी झाले कधी बरे,घर आता तू फुकू नको!
जुगार,मटका,गर्दुल्यांच्या,नादी कधी तू लागु नको!
नेत्यामागे चकाट्या पिटत,आयुष्य वाया घालु नको!
गरिबांना,फारअडवुनी तू कधी धन जमा करू नको!
मारामारी,खुनासारखे,भयंकर पाप करू नको!
संकटग्रस्त,अडकलेल्यां प्रति, दुष्टभाव तू ठेवु नको !
हाजी हाजी,करू नको!
उगाच,झगडे,करू नको!
बोल कुणाला तू लावु नको,
हाय कुणाची,घेवु नको !
लवकर जागा हो रे मनुष्या,संयमास, तू सोडु नको !!2
परस्रीआहे मातेसम,नजर तिच्यावर,तू टाकु नको !
वेश्यागमन वाईट असते,नादी त्याच्या लागु नको !
आला एडस रोग भयानक,नादी त्याच्या लागु नको!
घराबाहेरचे खाण्याची ,वाईट सवय लावु नको!
कारण तंबाखु कर्करोगा,कधी वाटेस जावु नको!
हातांत घेतल्या कामांसी, अर्धवट कधी सोडु नको!
धाडस भलते,तू करू नको!
मर्यादा ओलांडु नको !
व्यायामाला,तू सोडु नको,
दुर्बलता,दाखवु नको !
"अनिल सांगतो,आरोग्याती, हलगर्जी तू करू नको !!3
