STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

आगमन शारदेचे

आगमन शारदेचे

1 min
186

आला दिवस भाग्याचा 

किती आनंदले मन

देवी शक्ती दायिनीचे

शारदेचे आगमन ।।१।।


आगमन शारदेचे

अश्विनाची प्रतिपदा

बुद्धिदात्री सरस्वती

देवी विद्धेची शारदा ।।२।।


हाती धारूनिया वीणा

सप्त सुरांचा झंकार

दूर सामान्य जणांच्या

अज्ञानाचा अंधःकार ।।३।।


नऊ दिस नऊ रात्री

करू तिची आराधना

आदिमाया आदिशक्ती

मनोभावे उपासना ।।४।।


देवी दुर्गा रणचंडी

ऐक आवाज भक्ताचा

करी असुराचा नाश

दुष्ट वृत्ती विचारांचा ।।५।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन