STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

आगमन दिपोत्सवाचे

आगमन दिपोत्सवाचे

1 min
706

आगमन दिपोत्सवाचे सौजन्याचा     

कर्तृत्वाने झळकतोय आकाशात

प्रभावळ करूनी दिपावळीची

सुख समाधान देत असे जीवनात।।


लक्ष्मी घरात कश्या नटूनथटून

उमटवती पाऊलखुणा चैतन्य पेरूनी 

ठेवती वातावरण स्वच्छ निर्मळ  

परिसर आपला स्वच्छ करूनी।।


आल्हादपुर्ण दिवाळी येताच

उल्हासाच्या राशी तनामनात

शोभिवंत पणत्यांचा लखलखाट

चहूकडे हर्षाने मन शुद्ध होतं ।।


उल्हासाच्या अंगणी दिपावळीला

अनाथ लेकरांमुखी दोन घास भरावा

कृतार्थतेची आरास हृदयात मांडूनी

गरजूंची मदतीने दिपोत्सव करावा।।


पंचपक्वान्नाचा सुग्रास सुगंध

घरीदारी ममतेचा दरवळ 

आप्तजनांच्या भेटीगाठी  

हाच तो नामानिराळा फराळ।।


बळीराजा निराशेच्या गर्तेत दिसतोय

पावसाने केलाय चहूकडे कहर 

काय करू अन् कशी करू दिवाळी

चिंतेला नाही हो पारावार।।


रक्षण करावया वृक्ष पर्यावरणाचे

फटाक्यांवर आळा घालावा

वाचवूनी प्रदूषणाची विल्हेवाट

दिपोत्सवाने सार्थक करावा।।


Rate this content
Log in