STORYMIRROR

शिवांगी पाटणकर

Others

4  

शिवांगी पाटणकर

Others

आदिमाया आदिशक्ती

आदिमाया आदिशक्ती

1 min
341

तूच रेणुका माहूरची

महालक्ष्मी कोल्हापूरची

तूच सप्तशृंगी वणीची 

अन् भवानी तुळजापूरची


नाही तुजला जन्म मरण 

जगन्मूर्ति तू ज्ञानरूपिणी

व्यापिलें तू विश्वसर्व

तूच अनंतब्रम्हांडाची स्वामिनी


भक्तांसी रक्षीण्या आलीस 

घेऊनी अनंत अवतार

करुनी तू अधर्मनाश 

केला दृष्टांचा संहार


तू ब्रम्हदिकांची जननी

विद्यांची स्वामिनी 

तूच आदिमाया प्रणवरुपिणी 

अनंतशक्तींची स्वामिनी


करण्या असूरांचा नाश 

अवतरलीस तू भूवरी

महिषासुराचा करूनी वध 

बनलीस महिषासुरमर्दिनी


काली तू सरस्वती

महामाया तूच अंबिका 

या भवसमुद्राची नौका

जगदंबा तू चंडीका


जगताची साऱ्या आई

आदिमाया ग तू आदिशक्ती

दुःख हारीणी तू जग तारिणी 

सारे करिती ग तुझी भक्ती


नमस्कार करितो तुजला

कृपादृष्टी तू ठेव आम्हांवरी

आशिर्वाद असो पाठीशी तुझा

हे अष्टभुजा दुर्गा परमेश्वरी


Rate this content
Log in