आधुनिक नारी
आधुनिक नारी
1 min
186
नवयुगातील आधुनिक नारी
स्वत:च्या बाळाला जपते
स्वत:चे करियर सांभाळते
ऑफिसमध्ये नोकरी करते
महागाईचा सामना करते
घर व संसार सांभाळते
संसार व नोकरीचा तोल सांभाळत
तारेवरची कसरत करते
लॅपटॉपवर काम करत असतांना
बाळ रडतांना लगेच दूध पाजते
जीवनात संघर्ष करत लढाई लढते
काळाबरोबर सामना करत चालते
वेगवेगळ्या भूमिका निभावून
घराला घरपण मनापासून देते
स्वत:चे अस्तित्व सांभाळून
सर्वांनाच नीट जपते
घर संसाराकडे असते
तिचे नेहमीच पूर्ण लक्ष
ऑफिसातल्या कामातही
आहे ती कर्तव्यदक्ष
