आभासी दुनियेतील नाती
आभासी दुनियेतील नाती
आभासी दुनियेतील नाती
निभावताना खरं तर खूप
कस लागतो माणुसकीचा
बांध फुटतो कधी-कधी आपुलकीचा
बि-प्रॅक्टिकलच्या दुनियादारीत
खूप इमोशनल होऊन चालत नाही
खूप सारं मनासारखं मिळूनही
मन काही भरत नाही.
हेवे-दावे नशिबाचे
काही सुटत नाही
आयुष्य नात्यांशीवाय
पुढे सरतच नाही
हा असा वागला तो तसा
यात सारा नात्यांचा मनोरा भंगला
जीवनाचा आनंद लुटण्याऐवजी
माणूस आभासी दुनियेतच रंगला
आभासी दुनियेतील नाती
होते खुपदा त्यात गोची
सांगा तरीही माणूस एकला काही
करु शकतो का हो ख्याती
पण गुर्मी त्याची संपत नाही
जन्मास आला दोघांमुळे
मरताना ही खांदेकरी चार हवे
एकट्याने काहीच होत नाही
तरी का तो हट्ट करी
सख्खी नाती परकी करी
आभसी दुनियेतील नाती
मात्र आपली पक्की करी
ही नाती फक्त गरजेची
यात ओल ना जिव्हाळ्याची
वेळ येता रंग बदलणारी
अर्ध्यात साथ सोडणारी.
आभासी दुनियेतील नाती
आभसीच असतात
त्यांना ओढ नसते आपुलकीची
त्यात असते ऊर्मी फक्त अहंकाराची
