STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

3 एप्रिल

3 एप्रिल

1 min
462

आ ज आठवा दिवस

ठ रल्या प्रमाणेच उगवला

वा टत होते काहीतरी

दि व्य दिवसाची सुरुवात होईल...


व ळचणीतले क्षण पुन्हा

स  रसकट उफाळून येतील

   आठवणी जाग्या होतील

   आणि थोडे सुखावतील...


पण तसे घडले नाही

कालची मुलाखत विसरली नाही

पण नवीनच कानी पडले

दिवे लावण्या वाचून गत्यंतर उरले नाही...


काय असेल ते असेल

दिवे तर नक्कीच लावायचे

आणि कोरोनाला एकजुटीनेच

चांगलेच सामोरे जायचे...


आत्मउर्मी आत्मशक्ती आत्मतेज

पुन्हा संकल्प जागृत करायचे

त्या तेजातच सारे संकट

लीलया नष्ट करायचे....!


Rate this content
Log in