STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

3  

Meenakshi Kilawat

Others

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन

1 min
296

२६ जानेवारी सर्वात मोठा सण

मातृभूमीस करू आज शतशत वंदन 

मनापासुन देऊनी सन्मान हा 

तनामनाने करूया अभिनंदन... 


मुठीत आहे देशाचे भविष्य

अशोकचक्रात एकतेचे गान

करू भारतभूमीचे संगोपन

सारे मिळूनी वाढवूया मान....


होते पारतंत्र्याचे डोई ओझे  

आणले विरांनी महा परीवर्तन

करूया सुजलाम् सुफलाम्

ठेवू आदर्श संस्कृतीचा मान...


देशार्थ देह झिजले परी वीर 

शौर्याच्या तेजाने नभी झळकले

देशसेवेत प्राणाची आहुती देऊन

कर्तव्य सुगंधाने फुलुनी आले...


सर्व जाती धर्म नांदती सौख्याने

एकमेव आहे तो भारत देश महान

ऐक्याचे द्योतक तिरंगा आमुचा

मातृभूमीचा आत्म स्वाभिमान...



Rate this content
Log in