शांताराम को जिन्न
शांताराम को जिन्न
शांताराम को रोवना चालु होतो. गावमा रोवनाकी धामधूम रहेलक रोजदार् मिलनो मुश्किल होतो. खारखोद्यात् ढुंढस्यानबी गावमा दिसत नोहता. असोमा रोवना समयपर गाळनको कसो असो बिचार करत शांताराम सरयीवाल् मोऊखाल्या बसेतो. एतरोमा ओकी नजर बांधीमा एक चिज पर पडी. वु बांधीमा उतरेव अना ओन चिज ला हात मा धरीस. भरी होती म्हणून ओला पाणी लक धोईस अना हात लक साफ करन बसेव. देखसे त का, वाहान लक धुंगा निकलन लगेव अना घडी भर को बाद धुंगा न एक विशाल जिन्न को रुप लेईस. यव सिन देखशान शांताराम ला खुप भेव लगेव.
तब वु जिन्न, शांताराम ला कवन बसेव, "घबराओ नोको मोरो आका, मी तुमरो दास आव. मोला सांगो मी तुमरी कोणती सेवा करु." तरी शांताराम ला थोडी धास्तीच भरी होती. ओन थोडी हिम्मत बांधशान जिन्न ला खबर लेईस, "तु मोरो दास कसो? एकोपर जिन्न न सांगीस का जेको जवळ यव चिराग रवसे, ओको मी दास रहुसू." शांताराम न जिन्न ला खबर लेन बसेव, "तु मोरो साठी का कर सक सेस? मी बहुत चिंता मा सेव. गाव मा सबका रोवना एक साथ सुरु भया सेती. एको कारण लक रोजदार अना कोंडा खोदने वाला भेट नही रह्या सेत. मोरो रोवना समयपर कसो होये."
जिन्न शांताराम ला कसे, "तुमी आदेश देव, मोरो आका. तुमी जो कवो वु पुरो कर देऊन." शांताराम न जिन्न ला रोवना करन सांगीस. देखस त का ओको पुरो रोवना चुटकीमाच गाळशान भय गयव.
दुपारी शांताराम की घरवाली शिदोरी धरशान खेत आयी त देखसे शांताराम मोहुको झाड खाल्या ढुरकी लेत होतो. ओन ओला हलायशान उठाईस. शांताराम जसो उठसे अना देखसे त खेत जसो का तसो होतो. ओला समज मा आवसे का, वु सपना देखत होतो. ओला खुब दु:ख होसे अना रोवना कसो लगे येकी चिंता सतावन लगसे. शांताराम की घरवाली ओला धीर देसे अना शिदोरी सोडशान जेवन सांगसे. जेवन भयवपर वय दुयी जन खार खोदन लगसेत.
दुसरो दिवस पाहटलाच शांताराम खेतमा जासे अना चिखल करशान तयार ठेवसे. ओकी घरवालीन इत उत लक दुय बन्यार को जुगाळ करशान खेतमा पोहचसे अना दिवसभर रोवना लगावसेत. पाच दिवस को रोवना कसोबसो बारा दिवस मा पुरो होसे. अना ओन सालं शांताराम ला फसल चांगली होसे.
बोध:- सपना देख्योवलक अना हिंमत हारशान काही होने वालो नाहाय, मेहनत करो तबच फल भेटेती।
