ऋतूचक्र
ऋतूचक्र
निपचित पडलेल्या रस्त्यावर
वाळून भुरभूरत झालेली पानं
एक एक करत जमा होतायेत आणि
एखाद्या हलक्याश्या झुळूकेनेही
ती पानं तिथल्याच कुठल्याश्या
कड्याकपाऱ्यांत अडकून बसलीत
खाली पानांचा सडा आणि
वर टळटळीत सूर्य
आपल्याच तंद्रीत तळपतोय
ऋतू येतात ऋतू जातात
पान फुलं नव्यानं उमलतात आणि वठतातसुद्धा
भोगलेल्या ऋतूंचे सोहळे अनुभवत अनुभवत पुन्हा गळून पडतात
कालचक्र आणखी दुसरं काय !
काटेरी बंधन, कोडलेली नाती
उगवणारा सूर्य, वितळणारा पारा
हे न संपणारं ऋतूचक्र अव्याहत सुरूच आहे
एक एक पान फडफडत राहते आणि
शिशिराबरोबर गळून पडतं
आणि काळजात मनात एक
पोकळी निर्माण करून जातं
आजही तिथल्याच डोहात त्या वाळक्या फांद्या
पुन्हा एकदा गळून पडल्या
पुन्हा एकदा .......
कालचक्र आणखी दुसरं काय !!!!