Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

अक्षता कुरडे

Children Stories Comedy

3  

अक्षता कुरडे

Children Stories Comedy

चिंटू

चिंटू

1 min
782


चिंटू ने नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या ऑनलाईन शाळेत हजेरी लावली होती. बाई आज निबंध लेखनाची परीक्षा घेणार होत्या. बाईंनी सगळ्यांना निबंधा चा विषय सांगितला. विषय होता, "माझे स्वप्न". त्यासाठी वेळ होती अर्धा तास. परीक्षा सुरू झाली तशी चिंटू झोपी गेला. 


अर्ध्या तासानंतर


बाई: सगळ्या विद्यार्थ्यांनी पटपट मला काय लिहले ते वाचून दाखवा. 

एक एक करत सगळे लिहलेला निबंध वाचून दाखवू लागले. आता चिंटू ची पाळी येते. पण तो काहीच बोलत नव्हता. 

बाई: चिंटू काय झालं, तु शांत का आहेस..? निबंध लिहला नाहीस का..?

चिंटू: बाई परीक्षा सुरू झाली तसा लगेच मी झोपलो आणि अर्ध्या तासानंतर उठलो पण स्वप्न काही पडलेच नाही मला.


Rate this content
Log in