शरद ऋतु
शरद ऋतु
शरद ऋतु
आपल्याला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते तसेच सूर्यभोवतीही फिरते.ऋतू हे पृथ्वीच्या सूर्याभोवती परिभ्रमणामुळे होतात. तसेच पृथ्वीचा अक्ष काटकोनात नसून 23.5 डिग्री ने कललेला आहे. त्या अक्षाभोवती पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे ऋतू असतात. हिंदू पंचांगप्रमाणे भारतात पाळलेजाणारे सहा ऋतू आहेत.
वसंत =चैत्र, वैशाख,
ग्रीष्म = जेष्ठ, आषाढ
वर्षा = श्रावण, भाद्रपद,
शरद = अश्विन,कार्तिक
हेमंत =मार्गशीर्ष, पौष,
शिशिर = माघ, फाल्गुण
तर आपण आज शरद ऋतुबद्दल माहिती बघणार आहोत. शरद ऋतू हा भारतीय दिनदर्शीकेनुसार अश्विन, कार्तिक ह्या महिन्यात येतो. शरद ऋतूत पावसाळा संपलेला असतो शेतकऱ्यांची काही पिकांची काढणी झाली असते.काही पिकांची काढणी राहलेली असते.पृथ्वी हिरवीगार नटलेली असते. शरद ऋतूत निरभ्र आकाश, सुंदर, विलोभनीय चांदणं आकाशात बघायला मिळते. कित्येक कवीनी शरदाच्या चांदनावर कविताही केली आहे.ह्या ऋतूत पारिजात, कमळ, कुमुदिनी ही फुले बहरलेली असतात. पारिजातकचा सडा, चिखलात फुललेले कमळ असे मनभावन दृश्य ही बघायला मिळतात. भारतीय संस्कृतीत ऋतुमानानुसार सण साजरे करण्याची प्रथा आहे. वेगवेगळे सण त्या सणानिमित्त केले जाणारे पदार्थ हेही त्या ऋतुमानानुसारच आहेत. शरद ऋतूत शारदीय नवरात्र,दसरा, कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी हे सण येतात. शारदीय नवरात्र शरद ऋतूत असल्यामुळेच शारदीय नवरात्र म्हटल्या जाते ह्या नवरात्रात आपापल्या कुलाचारप्रमाणे घटस्थपना करून नऊ दिवस उपवास केल्या जातात तसेच नऊ दिवस देवाजवळ दिवस रात्र दिवा लावल्या जातो तसेच कुणी देवीजवळ धान टाकते.नऊ दिवस भजन पूजन, होम हवन पूजा अर्चा कन्याभोजन आदि उपासना केली जाते.
दहाव्या दिवशी विजया दशमी असते त्यालाच दसरा असे म्हणतात. श्रीरामाने ह्याच दिवशी रावणाचा वध करून विजय मिळवला अशी पौराणिक अख्यायिका प्रचलित आहे. ह्या दिवशी सर्व शस्त्रअस्त्रची पूजा केली जाते.ह्या दिवशी परंपरेनुसार आपट्याची किंवा शमीची पाने एकमेकांना दिली जातात. ह्या दिवशी गावाची वेश ओलांडण्याचीही प्रथा आहे.तसेच ह्या दिवशी सरस्वातीची पूजा करण्याची प्रथा आहे. पाटीवर सरस्वातीचे चित्र काढून त्याची पूजा करतात तसेच वह्या, पुस्तकांचीही पूजा केली जाते.
ह्याच महिन्यात कोजागिरी पौर्णिमा ही येते.कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात.ह्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ येतो. आणि ह्या दिवशी चंद्राची पडणारी किरणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असल्यामुळे ह्या दिवशी चंद्राचे किरण पडलेले आतलेले ड्रायफ्रूट्स घातलेले दूध ज्याला कोजागिरी म्हणतात ते आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते..रात्री जागून चांदण्या रात्री चंद्राची प्रतिमा त्या दुधात किंवा कोजागिरीत पडली की ते दूध पिण्याची प्रथा आहे. विदर्भात कोजागिरीच्या दिवशी भुलाबाईची म्हणजेच शंकर पार्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे.
हिंदूचा सर्वात महत्वाचा सण दिवाळीही शरद ऋतुतच येते.वसू बारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बालिप्रतिपदा, भाऊबीज हे सर्व दिवस दिवाळीत साजरे केले जातात.घराजवळ रांगोळ्या काढून, निरनिराळे फराळाचे पदार्थ बनवून घराबाहेर दिवे लावून, आकाश कंदील लावल्या जातो, नविन कपडे घेतात, मुले किल्ला बनवतात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते.
शरद ऋतु हा दुसरा श्रेष्ठ ऋतु मानल्या जातो. पहिला ऋतुचा राजा वसंत ह्याला म्हणतात. आशीर्वाद देतांना "जीवेत शत: शरदम " असे म्हटले पाहिजे म्हणजे शम्भर शरद आयुष्य लाभू दे.
अश्या ह्या शरद ऋतुचे अनन्यसाधारण महत्व आहे.
ह्या शरदऋतुचे वर्णन आपल्याला रामचरित मानस मध्येही बघायला मिळेल. तसेच कालिदासनीही सुंदर वर्णन शरद ऋतुचे केले आहे.
