STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

माझी कला माझी आवड

माझी कला माझी आवड

1 min
8

कलेची मी आहे उपासक

माझी कला माझी आवड

नवनवीन कला करण्यासाठी

खास करून मी काढते सवड.....!!


प्लॅस्टीकपासून फुले बनविते

कला शिकण्याचा माझा ध्यास

टाकावूपासून वस्तू बनवते

घर सजवण्याची असते आस....!!


प्लॅस्टीकचे निर्मूलन करण्या

टाकावूचा करते उपयोग

दर आठवडी उपक्रम घेते

विद्यार्थ्यांना त्याचा सहयोग...!!


कला ही कलाच असते

असते ती सुंदर कलाकृती

मानवाला देवाने दिलेली

असते एक सुंदर स्वीकृती......!!


ठरवलेय बाहेर नाही जायचं

कलाप्रेमी व्यक्ती बनायचं

कोरानाला पळवून लावण्या

कलाकृतीचा छंद जोपासायचं.....!!


रिकामा दिमाग शैतान का घर

मेंदुला नेहमी क्रियेटीव्ह बनवायचं

प्लॅस्टीकपासून सुंदर कलाकृती

बघा सारं शिकून घ्यायचं.......!!


Rate this content
Log in