फुस
फुस
फुस
नैतिकता ही नाही आता लावतात फुस
आपला असो की परका हे खातात घुस !!
येथे नाही भरवसा आपल्या माणसावर
तेथे तुम्हा कसा हो भरवसा दुजावर
दाखवती हो आपुलकी हे वरचेवर
विश्वासघात करतील तेच खरोखर
तुम्ही समजता त्यांना आपलाच श्र्वास
तेच आता तोडतील तुमचा विश्वास !!
नैतिकता ही नाही आता.....
रस्त्या रस्त्यावर अन् चौका-चौकात
हेरण्या आपले सावज टपून बसतात
आया-बहिणींना हे टकमक पाहतात
पाठलाग करून त्यांचा त्यांना छळतात
विनयभंग बलात्कार करती राजरोस
थोडीशीही लज्जा नाही यांच्या मनास !!
नैतिकता ही नाही आता.....
आता नाही होत येथे फुकट अॅडमिशन
बालवाडीसाठी द्यावे लागते डोनेशन
श्रीमंतच आता येथे शिक्षण घेतील
गरिबांचा वाली नाही कसे हो शिकतील
अमीर होई अमीर नाही साथ गरिबास
अमीर-गरीबीची दरी कशी होईल खल्लास !!
नैतिकता ही नाही आता.....
