रंग जीवनाचे
रंग जीवनाचे
सुख दुःखी आनंदी क्षणासारखे
ऊन सावली सारखे रंग जीवनाचे।।१।।
कधी स्पर्श होतो मनाला मोरपंखाचा
कधी घाव पडे पायाला दगडाचा ।।२।।
कधी जीवन रंगते सप्तरंगी इंद्रधनुत
कधी हात रंगतात काळ्या मातीत ।।३।।
कधी भिजते मनं खोल पाण्यात
तोच रंग त्याचा मिसळेल ज्याच्यात ।।४।।
इंद्रधनुचे सप्त रंग लाभले जीवनास
नवरात्रीचे नऊ रंग हर्ष देते मनास ।।५।।
प्रातःकाल समयीचे रंग रांगोळीचे
आयुष्यात भरावे असे रंग जीवनाचे।।६।।
मनमोहक, पारदर्शी,रंगहीन शोभेचे
असे अनेक रंगाचे रंग जीवनाचे।।७।।
सुख,दुख,मोह,माया, ममतेचे
असे अटूट नात्याने भरले रंग जीवनाचे।।८।।
जीवनात असे रंग भरावे माणुसकीचे
द्यावे धडे जनमानसा प्रेमाचे,एकोप्याचे ।।९।।