ध्यास तू
ध्यास तू
1 min
143
ध्यास तू आस तू, तू हृदय संजीवनी
आस तू भास तू, तुझी छबी सदा मनी ॥धृ॥
अनामिक ओढ मनी, वेडी प्रीत बहरली
सखे मला आज, प्रेमाची वाट गवसली
होशिल ना या रसिक चंद्राची तू यामिनी
श्वास तू भास तू , तुझी झबी सदा मनी ॥१॥
मनाची तार छेडिता, मम ह्दयी झंकार
प्रेमाचा सुर लागता, मैफिल ही रंगणार
रंगता प्रेम सोहळा, मधुमास जीवनी
श्वास तू भास तू, तुझी झबी सदा मनी ॥२॥
प्रीतीचा गंध सखे, मनी या दरवळला
मनातील प्राजक्त , तुझ्या हृदयी ओघळला
लावलेस वेड मला, घातलीस मोहिनी
श्वास तू भास तू , तुझी छबी सदा मनी॥३॥
