STORYMIRROR

Achala Dharap

Others

3  

Achala Dharap

Others

पैसे

पैसे

1 min
215


पाच, दहा पैशात पण किती मजा होती 

पोटभर चणेचुरमुरु-यांची जणू पोती येत होती. 

बडिशेपेच्या रंगीबेरंगी गोळ्या नि लिंबु गोळीची चंद्रकोर

एवढा खाऊ बघुन नाचायचा मनमोर.


बोरे, चिंचेचा वाटा मिळायचा पाच,दहा पैशात

आईने पैसे दिले की आनंद नाही मावायचा गगनात

मे महिन्यात मिळायचा दहा पैशात वाटा करवंदाचा

कोंबडा की कोंबडी विचारत क्षण होयचा आनंदाचा.


वीस पैशाचं नाणं आलं षटकोनी

दुप्पट पैशाच नाण बघुन हर्ष झाला मनी

एक, दोन पैशाची साठवत होतो नाणी

वीस पैशाच नाणं बनल त्यांची राणी.


पंचवीस पैशाचं नाणं म्हणजे चार आणे

तो पाव रुपया साठवण्यासाठी शोधायचो बहाणे

हळुहळू कमी होत गेली किंमत या नाण्यांची

मजा गेली बटव्यात नाणे खुळखुळण्याची


Rate this content
Log in