फुलाचा प्रवास
फुलाचा प्रवास
1 min
134
पानांच्या कुशीतून...
देठाला धरुन..
प्रसवते कळी.
सूर्याच्या किरणाने
वाढते हळुहळू ....
प्रत्येक कळीला
आस असते;
उमलण्याची..
फुलण्याची...
वा-यासंगे डुलण्याची!
मग होते परिपक्व
आणि तो दिवस उगवतो
कळी हसते....
फूल फुलतं....
त्याच्या रंगाने, गंधाने
खुलतो परिसर.
काही फुलांच्या नशिबी असतं
देवाला अर्पण होणे..
काही फुले शृंगार वाढवतात
काही शेज सजवतात
काही कोमेजून जातात
सुकतात....
संपत अस्तित्व.
प्रत्येक उमलणार फुलं
असतं अल्पायुषीच!
पण काही भाग्यवान असतात
ईश्वरचरणी अर्पण होवून
निर्माल्य म्हणून सुद्धा पवित्र!
