प्रेमाची ओंजळ
प्रेमाची ओंजळ
1 min
182
आईची प्रेमाची ओंजळ
होत नाही रीती
सतत जाणवत असतात
तिच्या प्रेमाच्या स्मृती
वडीलांची प्रेमाची ओंजळ
सदा असते भरलेली
धाक आणि कर्तव्याच्या
मागे कायमच लपलेली
आजी आजोबांची ओंजळ
भासते निर्मळ झ-यासारखी
झुळुझुळु वहात रहावी
होऊ नये पारखी
प्रियकराच्या प्रेमाच्या ओंजळीत
असतो गुलाबी रंग
हवासा वाटतो सहवास
असतात एकमेकांत दंग
पतीच्या प्रेमाच्या ओंजळीत
सदैव असावा ओलावा
आयुष्यभर वेगवेगळ्या रुपात
वाटतो हवा हवा
