व्यथा पुस्तकाची
व्यथा पुस्तकाची
नव्हते टी. व्ही. मोबाईल जेव्हा
मीच तुमचा मित्र होतो ना तेव्हा
आता तर आठवण होतच नाही ना माझी
कारण झाली आहे मैत्री मोबाईलशी तुमची
पुराणकाळापासून देत आहे मी ज्ञान मोलाचे
मीच होतो ना मनोरंजन फावल्या वेळेचे तुमचे
घेत होतात माहिती हवी ती माझ्याकडून
आता काय झाले मला पाहता फक्त दुरुन
किती कवी लेखकांनी वाढवला होता माझा मान
दर्जेदार लिखाणामुळे केला कित्येकांनी माझा सन्मान
इतिहासाचे क्षण सोनेरी व्यक्त झाले पानांवर माझ्या
आत्मचरित्रांची मेजवानी मिळाली अंतरंगात माझ्या
चांदोबा, चंपक, किशोर आवडती बालगोपाळांची
फिल्मफेयर, गृहशोभिका ही तर आवड सर्वांची
वर्तमानपत्रे तर होती भांडारे समस्त ज्ञानाची
लोकांनाही होती तेव्हा सवय वाचनाची
वाचन आजकाल किती लोप पावत चाललंय
मोबाईलचं भूत सगळ्यांच्या मानगुटावर बसलंय
अभ्यासाचं पुस्तकही ओझं वाटू लागलंय
पुस्तकही म्हणे आता ऑनलाइन मिळू लागलंय
विनंती एकच माझी तुम्हां सर्वांना आहे
एकदा तरी गाव पुस्तकांचं पाहून यावं
मुलांना समजावावे महत्त्व वाचनाचे
मोबाईलपेक्षा कधीही चांगलं एक पुस्तक वाचाव.
