चित्रपट
चित्रपट
1 min
262
चित्रपटाची मजा न्यारी
ती तर सगळ्यांना प्यारी!
कधी विनोद, कधी मारामारी
बघुन वाटे सारेच भारी!
चित्रपटातील पाहुन प्रेमकहाणी
दिवास्वप्न बघत गातात गाणी
चित्रपटातील बघता स्वप्नसुंदरी
वाटते अशी बायको मिळाली तर भारी!
बघता चित्रपटातील प्रणयाचे प्रसंग
गुदगुल्या होऊन चेहऱ्यावर गुलाबी रंग
रंगवली जातात मधुचंद्राची स्वप्ने
सत्यात येतात जर जुळली मने
भावा भावांचे हेवेदावे ,सासुसून भांडणे
मनस्थिती बिघडते पाहुन हे रडगाणे
मारामारी, व्यसन,अश्लीलतेचे प्रसंग
लहान मुलांचा होतो असंगाशी संग
