संसाराचा दास
संसाराचा दास
1 min
200
संसाराचा दास देह हा पसारा
करी येर झारा जन्मोजन्मी !!१!!
स्वान करी ओक तेची खाये दारी
उपरती परी होतं नसे!!२!!
दीप पतंगाचे मरण ते पुळे
तरीही ना कळे संसारिया!!३!!
संतदास म्हणे जन्मं हरिवीन
नरक संपूर्ण घडे त्याशी !!४!!
