असं का व्हावं ?
असं का व्हावं ?
वेलीवरचं फुल खुंटावं,
ते असच कोमेजून जावं,
पुन्हा दुसर फुल उमलाव_ _ _ _
असं का व्हावं?
नदीचं पाणी सागराला मिळावं,
तलावाचं पाणी आम्ही रिक्त करावं,
पुन्हा पावसाने तलाव भरावं _ _ _ _
असं का व्हावं?
पहाटेचं गुलाबी स्वप्न पाहावं,
सूर्याच्या किरणांत न्हाऊन निघावं,
पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच घडावं _ _ _ _
असं का व्हावं?
शितल प्रकाशात मनं रमावं,
पौर्णिमेच्या चंद्राने हसत राहावं,
पुन्हा हसत प्रेमिकांना सुख द्यावं _ _ _
असं का व्हावं?
कधी सुख यावं, कधी दुःख यावं,
जुन्या आठवणीतच गुंग राहावं,
पुन्हा पुन्हा निसर्गाचं चक्र फिरावं _ _ _ _
असं का व्हावं?
