पावसातले खेळ
पावसातले खेळ
1 min
136
ये रे ये रे पावसा शाळा सुटल्यावर
धम्माल करु मग आम्ही तुझ्याबरोबर
रस्त्यावर साठलेल्या पाण्यात आम्ही मारु उडी
मोबाईलच्या गेममधे मग वाटणार नाही गोडी
एकमेकांच्या अंगावर उडवू आम्ही पाणी
आनंदाने गाऊ आम्ही पावसा तुझी गाणी
वाॅटर पार्कच्या पाण्यात नाही येतं एवढी मजा
खेळू आम्ही मोकळ्या हवेत जरी मिळेल सजा
कागदाची होडी करुन सोडू आम्ही पाण्यात
होईल आनंद जेव्हा होडी तरंगेल दिमाखात
होडीच्या मागुन जातं होऊ आम्ही ओले चिंब
मजा येईल जेव्हा पाण्यात दिसेल आमचं प्रतिबिंब
