जन्म माझ्या बाळाचा...
जन्म माझ्या बाळाचा...
1 min
283
आगमन तुझे होताच
आयुष्य मजला उमगले
डोळ्यात तुझिया मला
जीवन जगण्याचे कारण दिसले..
गोड हास्य हे तुझे
आनंद सर्वत्र फुलविते
मनाच्या कानाकोपऱ्यात
आनंदी झुले झुलविते...
बाळ माझा तू शहाणा
होशील रे बहुगुणी बाळराजा
आयुष्यात खूप कमवशील
आनंद, सुख, समृद्धी, मौजमजा..
बाळ माझा देखणा
गुणी, गोरा-गोमटा
माणुसकी, यश,
समृद्धीचा करशील बहुसाठा...
आनंद सर्वांसाठी घेऊन
नवचैतन्य घेऊन आलास
शिकवशील सर्वांना
आनंदी आनंद जगण्यास....
