STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others

माझी कविता

माझी कविता

1 min
222

मनात आलेल्या गोष्टी 

नोंदविते ही लेखणी

शब्द कागदावर लिहिताना

दिसतात किती देखणी


शाळेच्या पहिल्या वर्गात

कलम गिरवितो पाटीवर

शिक्षणाची सुरुवात होते

लक्ष वळणदार अक्षरावर


मग हाती येतो कागद अन

असेल लिहायला पेन शाईचे

वाचलेले मुद्दे लिहून काढावे

पूर्ण करावे धडे गृहापाठाचे


शिक्षणाने होतो समृद्ध

जीवन जगतो सुखाचे

आत्मा ही आनंदी होतो

विसरतो क्षण दुःखाचे


पेनातल्या निळ्या शाईने

लिहितो शब्द कागदावर

मनी भावना व्यक्त करतो

लिहून कविता आत्म्यावर


साहित्याला गुण द्या
लॉग इन