STORYMIRROR

Swarupa Kulkarni

Others

4  

Swarupa Kulkarni

Others

नवरात्रीतला रंग लाल

नवरात्रीतला रंग लाल

1 min
265

नमामी दुर्गे दशप्रहरण धारिणी,

नेसलीस तू रक्तवर्ण वसने,

शुभाशिष दे भवानी वर दे,

आलो शरण तूला चंडिके


मी वहातो रक्तवर्ण कुसूमे

आई तवपदी नम्रभावे,

विनंती ही मज सांभाळी 

रक्तवसना मृगनयने


तू रणचंडिका महामाया दुर्गा

भगवती शतकमलाक्षी,

संध्येसम तव काया भवानी

मी करितो प्रार्थना नत तव चरणी


तू उग्र रूप धरिसी महिषासूर वधाया

हे रक्त सांडले त्रिशूळ तुझे उपसता

मी जाहलो कंपित रूप तुझे भयकारी

तू उदार जननी तारक परि भक्तांसी


उदयोस्तू भगवती जननीअंबिके

दे प्रसाद मजला मनःशांतीचा

विनवितो सकलारंभे

तव चरणी महादेवी आनंदे



Rate this content
Log in