STORYMIRROR

purushottam hingankar

Others

3  

purushottam hingankar

Others

गुणाची लेक

गुणाची लेक

1 min
128

लेक नव्हे माझी परक्याचे धनं

होवो आयुष्मान सुरमयी!!१!!


चंद्रें शीतलता प्रेमाचा सागर 

मायेचा पदर लेक माझी!!२!!


रत्नांची ते खान पोटी शुद्ध दान

असावी ते जाण माय बापा!!३!!


जये पोटी आले शिवाजी महान

शूर हनुमान याच जगी!!४!!


अहिल्या द्रौपदी जिजाऊ सावित्री

मुक्ताई धरित्री मंदोदरी !!५!!


संतदास म्हणे धन्य तेची लेक

रक्षीतसे एक संस्कृतीशी !!६!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन