नमस्कार मातीला
नमस्कार मातीला
1 min
281
आज केला सुट्टीचा अर्ज
माझ्यावर मातीचं कर्ज
गरीबी दुर नमस्कार मातीला....
माझं आज नशीब बदललं
सूख माझ्या हाती आलं
काय करू दुखाच्या वातीला....
लोकांनी माझी केली कदर
आज पांघरली पैशाची चादर
माझे सारे माझ्या सोबतीला...
माझी माती माझा सहारा
तिच्या ओटीत मिळाला निवारा
आज लावून बसलो छातीला...
संगमच पाऊल पडलं मातीतं
कुठे हरवलं होतं माझं अतीत
माझी माती लागली माझ्या हातीला...
