या घरची सुन
या घरची सुन


दारुड्या पतीच्या मृत्यूनंतर गांवकर्यांनी आणि शेजारच्यांनी शकुला जबाबदार धरण्यास सुरुवात केली. ती आसपासच्या लोकांना आणि शेजार्यांना समजावून सांगायची पण कोणीही तिचे ऐकले नाही. देशी दारू पिऊन नाव चालविताना संतुलन बिगडुन तो नदीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. डॉक्टर साहेबही असेच म्हणाले. पण ही अशिक्षित लोक ?यांना काय माहिती? ते शकुला नेहमी दोषी मानत होते, कारण ती शेजारच्या गावची होती. म्हणून सर्वजण तिच्या विरुध्द झाले. तीचा छळ करायाला लागले . तीच घरातून निघणे कठीण होते. ती जिथे दिसेल तिथे तीला कलांकिनी म्हणायचे. गरीब बिचारी शांतपणे तिचे काम करुन तिच्या छोट्या झोपड्यात रडत यायची. तीला अनेक प्रकारे त्रास देण्यात आला. एके दिवशी तीला वस्तीतून बाहेर काढण्यात आलं तीला जबरजस्ती हकलुन काढण्यासाठी सगळे गांवकरी जमले तिच्या घरात घुसून तीची भांडीवसामान सगळ बाहेर फेकुन दिल .
तीचा बालपणाचा मित्र काशीराम व त्याच्या आईला पोस्टमनकडून ही बातमी मिळाली. तो शांत राहू शकला नाही त्याला खुप राग आला . बालपणातच त्याच्या आईने शकुला त्यांची सून म्हणून स्वीकारले होते. त्याला शकु बरोबर खेळताना पाहून काशीरामच्या आईला खूप आनंद झाला. पण शकुच्या आई-वडिलांशी बोलण्यापूर्वी तिचे लग्न झाल्याची बातमी आली. हे जेव्हा काशीरामला कळले तेव्हा तो फारच दुखी आणि निराश झाला. त्याच्या आईने त्याला सांभाळुन घेतले समजवले. पण आज परिस्थिती बदलली होती, तीचे पालकही नव्हते. तिला एकटी झाल्यामुळे तिला अत्याचाराचा सामना करावा लागला. ती त्वरित तिच्या वस्तीत एक मजबूत काठी घेऊन पोहोचली. काशीरामसुद्धा तीच्या मागोमाग कोयता घेऊन चालला.
पाहिले तर तीच सर्व सामान अंगणात विखुरलेले होते. झोपडीत ती रडत होती.
तीचा रडण्याचा आवाज ऐकूनही कोणालाही दया वाटली नाही. दोघांनी तीला एकामागून एक हाक मारली पण त्या बदल्यात आतून फक्त रडण्याचा आवाज आला. काशीरामच्या आईने आत जाऊन शकुला समजावून सांगितले पण तिच रडण काही थांबेना.
तिला कळले कि, की शकु गावच्या माणसांना घबरली म्हणुन ती काशीरामला म्हणाले " चल रे ! सखुचा हात धरुन तीला घेऊन ये . मी पण बघतेच आता कोण काय करतो, तीला सर्वांच्या समोरुन आपल्या घरी घेऊन जाऊया ?"
"बरं आई" असं म्हणत काशीरामने त्याच्या उपरणची गांठ सर्वांसमोर तिच्या पदराशी बांधली. कोयत्याने स्वताचे बोट कापून त्याच्या रक्ताने तिला टीळा लावला . आणि मोठ्याने ओरडला, " पहातो आता कोण शकुला वस्तीतून बाहेर काढू शकेल, अरे तूम्ही तीला वस्तीतून बाहेर काय काढणार? मीच लग्न करुन माझ्या घरची सून बनवुन घेऊन जातो. आजपासून आमच्या कुटूंबासमवेत आहेस. बघू कोणी काय करतो....
हातातला कोयता आणि त्याच्या आईच्या हातातली काठी पहुन पाहून सगळे घाबरले. त्यांना वाटले की शकुला वाचविणारा कोणी नाही. काशीराम आणि त्याची आईला पाहिल्यावर सर्वांचे डोळे फाटले. आता तेथे शांतता होती. एका क्षणात सर्व विखुरले.
नवीन वधूसह ते आनंदाने त्यांच्या घरी आले. जिथे काशीरामची बहीण आरतीचं ताट घेऊन त्यांच्या स्वागतासाठी दारातच वाट पहात उभी होती.