Yogita Takatrao

Others

2  

Yogita Takatrao

Others

वर्तुळ

वर्तुळ

3 mins
1.5K


सुजल नदी काठावर बसून हातात येतील तेवढे दगड,गोटे एकेक करत नदीत भिरकावत होता. आणि कसल्याशा विचारांनी त्याच्या मनावर एवढा कब्जा केला होता, की आजुबाजूला काय होतंय,काय घडतयं,सारं काही त्याच्या पासून अनभिज्ञ.अश्या विचाराधीन सुजलला आपल्या बाजूला कोण येऊन उभं राहिलंय हया गोष्टीचंही सोयर सुतक नव्हतं. तो भला आणि त्याची ती तल्लीन समाधी भली. काय रे, ए ,सुजल्या ? कुठे तंद्री लागली आहे तुझी? दहा मिनिटे झाली, मी इथे उभं राहून वाचतोय तुला! आणि तुझ्या पुस्तक रूपी देहाची पाने उघडेच ना? काय झालं? परत चिंतातुर दिसतंय तुझं मुखपृष्ठ,आणि 13 का वाजलेले आहेत तोंडावर. काही नाही रे प्रियम! नेहमीचच ,विशेष असं काही नाही, वही घिसी पिटी,मेरी कहानी,मेरी जिंदगानी! अरे सुजल, बक दे तेरी जुबानी,प्रियम आपल्या मित्राला म्हणाला! काही नाही रे, पण असं नेहमीच का रे? ज्यावर, ज्या माणसांवर आपण जिव ओवाळून टाकतो,त्याला आपली तसूभरही पर्वा नसते, आपण आपलं मरेतो करायचं, आणि समोरच्याला किंमत शून्य गुणिले शुन्य! हमममममममम् ! ओक तु ओक,सगळंच ओक मनातलं, तेव्हाच सामान्य होशिलं,प्रियम, सुजलला बोलला! आजपण आईने दाखवूनच दिलं, की तिला माझ्यापेक्षा, दुसऱ्या भावंडांची जास्तच काळजी, पर्वा, चिंता आणि प्रेमही आहे, सगळंच करून द्यायला मी हवा फक्त. मी जळत नाही आणि त्यात मला कोणाबद्दलही असूया नाही, ना मला असं वाटतं की, की तिने माझाच उदो,उदो करावा,पण वाईट वाटतं, जे रोज करतात त्यांची किंमत का नसते,आणि जे कधितरीच ,काहीतरी करतात त्यांच सगळयांनाच एवढं अप्रूप का? आहे तुझ्याकडे उत्तर मित्रा? हममममममममम्,तर हे कारण आहे तुझ्या नैराश्य आणि उदासीनतेचं! हे बघ,सुजल, एखादं फुलांच झाड बाराही महिने किंवा रोजच फुलं देत पण काही झाडं वर्षातून एकदाच फुलं देऊ शकतात, आत्ता मला सांग कुवतीप्रमाणे श्रेष्ठ कोण? रोज फुलं देणार झाडं, मग म्हणुनच त्यांची किंमत मोजणारा, मोजुच शकत नाही, आणि कुवत नसेल, आणि खुप कामं करण्यात आल्यामुळेच किंमत होते, मग आता सांग मला एक? किंमती वस्तू मोठी की अनमोल वस्तू?? अर्थात अनमोल वस्तू! सुजल बोलला. मग तु अनमोल आहेस ना रे, आणि देत रहायचं आपण,कोणतीही अपेक्षा न ठेवता, आणि तुला असा अनुभव येत असेलचं कधीतरी, ज्याच्या साठी आपण काहीही करत नाही, तो माणूस आपल्या साठी भरभरून करत असतो ,अगदी अनपेक्षित असतं आपल्या साठी. हो प्रियम,बरोबर बोललास,आणि त्यांचं आपण काहीच केलेले नसते तरीसुद्धा, काही माणसं, कोणत्याही रूपाने येऊन खुप महत्त्वाच्या गोष्टी देऊन जातात,सुजल म्हणाला. तेच बोलतोय, सुजल, हे एक प्रकारचं देत राहण्याचं वर्तुळ आहे, सो डोण्ट ब्रेक दिस चेन! तु तुझे कर्म करत रहा, फळाची आशा न करता, पण अनपेक्षितपणे तुला जे परतीचं फळ दुसऱ्याच माणसांकडून मिळत ना,तु तेच बघ मित्रा! छान बोलतोस रे,दुकान उघड ना एक प्रियम,मानसशास्त्रिय वैद्य, प्रियम शिंदे! उघडतो हा उघडतो,चल 1500/- काढ,मी दिलेल्या सल्याबद्दल! आणि काय रे सुजल,तुझं डोकं रिकामं घर झालं आहे, गुंतवून टाक त्याला, योग्य जागी,आज येतोस का? नाही तु येच माझ्या बरोबर, गिटार क्लास ला,मग डोकं, मेंदू, काही नवे करतील ना तर तुझ्या मेंदूला हया नैराश्यवादी विचारांसाठी वेळंच नाही मिळणार, तु प्रयत्नांची पराकाष्ठा करशील, सराव करशील, नविन गोष्टी आत्मसात करशील, आणि तु नेहमीच टवटवीत राहशिल, म्हणजे तुझा मेंदू टवटवीत राहिल! असं म्हणुन प्रियम ने सुजल चे दोन्ही हात, आपल्या हाती घेऊन, त्याला काही कळायच्या आतच, त्याचाच हातांनी त्याच्या दोन्ही गालांवर जोराने ,थोबाडीत लावल्या आणि मोठ मोठ्याने हसत पळून गेला आणि सुजल त्याच्या पाठी, अरे ह्या वेळी, कशाला कानाखाली मारलं, ते पण माझ्या हातांना मोहरा बनवून, ते तुझ्या 13 वाजवून बसलेल्या, देवदास अवतारासाठी,प्रियम धावतच उत्तरला, सोडत नाही आज तुला प्रियम, गेलास कामातून, अगर माझ्या हाती सापडलास ,सुजल बोलला! आधी पकडून तर दाखवं.............आणि दोघेही पळतच गिटार क्लासला पोहोचले! अरे प्रियम ने पळवत मला इकडे पोहोचवलं देखील आणि मनोमन त्याला वाटलं, परोपकार नाही त्याच्या मित्राने नैराश्यातून पुन्हा एकदा बाहेर काढण्याचं वर्तुळ पूर्ण केलं होतं आणि मनापासुन त्याने मनातचं त्याचे आभार मानले !


Rate this content
Log in