विश्वास विजय
विश्वास विजय


अचानक हवामान बदलले. ढगांच्या गडगडाटीला सुरुवात झाली. मधेच वीज कडकडू लागली. जोरदार वारे वाहू लागले. पावसाचे पाणी मोठे मोठे थेंबात बदलू लागले. हळू हळू पावसाचा सगळा राग धरणीवर कोसळला. मुसळाधार पाऊस सतत हे दोन तीन तास सातत्याने पडत होता , जो थांबण्याचे नाव घेत नव्हते. सगळे घाबरले. तरीही रामुकोळी काही लोकांसह छत्री घेऊन नवरदेवाला, त्याच्या नातेवाईक आणि वरातसोबत घरी आणण्यासाठी नदीच्या काठावर पोहोचला. आता बराच उशीर झाला होता, परंतु कोणतीही होडी काठावर येताना दिसली नाही. आतापर्यंत पुराचे पाणी धोक्याचे चिन्ह ओलांडले होते. दर सेकंदाला पाण्याचा प्रवाह वाढत होता.पण रामू तिथेच वाट पाहात उभा राहिला .
सकाळपासूनच कोळ्यांच्या वस्तीत बरीच हालचाल सुरू होती. आज रामू कोळ्याची मुलगी, चंद्राचं लग्न होतं . तिच्या लग्नाची तयारी मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्याचं सगळ कुटुंब लग्नाच्या घाईत होती . घरात सजलेली वधू चंद्रा तिच्या नवरदेवाची वाट पहात होती . आज तिला तिचा नवरदेव दिसेल, असा विचार करून ती लाजत होती. घरात खूप गडबड गोंधळ होते. नृत्य, गायन, ढोलकीच्या थापामुळे सर्व वातावरण आणी मैत्रिणींच्या खळखळुन हसण्याच्या गोड आवाजाने सर्व वातावरण आंनंदी वाटत होते .
अशा परिस्थितीत हवामानाने आपला जसा आपला बेतच बदलला आणि नवीन रंग दर्शविण्यास सुरवात केली. अतिवृष्टीमुळे सगळेच घाबरले . प्रत्येकजण विचार करत होता की आता काय होईल? प्रत्येक जण काळजी करू लागला? पण रामुकोळीला पावसाची किंवा वादळाची पर्वा नव्हती. त्याने आपला संयम गमावला नाही. इतर सर्वजण घाबरून आप-आपल्या घरी गेले.,नदीकाठी तो आपल्या जावयाची ,समधीची, आणि वरातीची वाट पाहत होता. काही वेळा नंतर त्याला एक सजलेली होडी दिसली, रामदिनचे डोळे आनंदाने चमकले. पण क्षणातच ती एका मोठ्या लाटेत बुडाली. हे पहाताच रामुकोळी बेशुध्द होऊन जागच्या जागीच कोसळला.
ही बातमी घरात पोहोचताच, क्षणातच शोककळा पसरली. जिथे लगीन घाई उडाली तेथे भयानक शांतता पसरली. जे पाहूणे आणि नातेवाईक चंद्राला वधू म्हणून सासरी पाठवण्यासाठी आले होते त्यांनी तिला विधवा करण्याचा आग्रह धरला, परंतु निश्चितच तिचा नवरा लग्न करुन तिला घेण्यास परत येईल असा विश्वास चंद्राला होता. पण कोणी तीचे ऐकले नाही. काही महिलांनी जबरदस्तीने तिच्या बांगड्या जमिनीवर आपटून फोडल्या. ती पण बिचारी जागच्या जागीच बेशुद्ध झाली . रात्रीने दुꓽखाचं पाघरुण पांघरले .
(२)
दुसर्या दिवशी वादळाचा अंत झाला. सर्वत्र शांतता होती. नदीच्या लाटा शांत झाल्या. काही लोक लांबुन एका साध्या होडीमध्ये येत होते. हळू हळू ती होडी नदीच्या काठावर आली. खाली उतरल्यावर कोणीतरी काठावर पडलेले पाहून त्या व्यक्तीला जवळून पाहिल्यावर समजले की तो रामु कोळी होता . जो काल आपल्या जावईची वाट पाहत होता .ते आपापसात बोलत होते. त्याचे वडिल नवरदेवाला बोलले,"अरे ! हरिबेटा, हे रामुकोळी , तुझे सासरे, काल आपली वाट पाहत वादळात उभे राहिले आणि बेशुध्द झाले .
हरिच्या वडिलांनी रामुकोळाला ओळखले आणि हरिला म्हणाले, यांना उचलुन घेऊन जाऊया. हे ऐकून हरि धावत आला आणि त्याला उचलले व घराकडे चालले. घरी पोहोचल्यावर त्यांना पाहून घरातली वरिष्ठ मंडळी घराबाहेर पडले. रामूकोळीला संभाळुन आणायला सांगून ,अंगणात दोन खाट बाहेर आणल्या. ताबडतोब रामुकोळीला उपचारासाठी गावातल्या वैद्यांकडे सूचना पाठवण्यात आली त्याच्यावर आधी उपचार करायचा आणि त्याला घरात नेण्याचा आदेश देण्यात आला. वैद्य लवकरच आले आणि उपचार सुरु झाले .
दुसर्या खाटेवर जावई आणि त्याच्या नातेवाईकांची बसायची व्यवस्था केली गेली . नंतर रामुकोळीचा मोठा भाऊ त्यांच्यावरोबर बोलू लागला. काही लोकांना जावई आणि त्याच्या कुटुंबियांच्या मेजवानीची जवाबदारी सोपण्यात आली .आत वर मंडळी ,वधूच्या घरी येण्याची बातमी मिळताच आनंदाची लाट उसळली. चंद्राला शुध्दीवर आणलं आणि कळवलं, वादळामुळे त्यांनी सीतापुर गावातच रात्री त्यांनी वस्ती केली . अशी माहिती मिळाली कि ते ज्या होडीत बसले त्या होडीत एक भोक होते ते नवरदेवाला दिसलं तो आपल्या वडीलांना म्हणाला नदीच पाणी भरुन ती होडी बुडेल " म्हणून भीतीने त्यांनी होडी बदलली. दुसर्या दिवशी वादळ शांत झाल्यावर ते साध्या होडीतून नांदगाव येथे आले.
मग हे ही उघडकीस आले की, सजवलेली होडी बुडताना पाहून रामदीन बेशुद्ध पडला. त्याच्याकडे कोणीच नव्हते .हे पाहून हरि आणि त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना सोबत घेऊन आले. तिच्या वडिलांची तब्येत चांगली झाल्यावर वडिलांनी थाटामटात चंद्राचं लग्न लावुन दिले . चंद्राचा विश्वास जिंकला. तीचे शब्द खरे झाले. ती आनंदी झाली आणि आनंदाने सासरी गेली .