Sangita Tathod

Others

3  

Sangita Tathod

Others

विरह संपला

विरह संपला

4 mins
288


      दिवाळी अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली होती .सुधाचा उत्साह अगदी ओसांडून वाहत होता .

घराची सफसफाई ,रोषणाई ,खरेदी अगदी सर्व सर्व तिने स्वतःच्या पसंतीने आणि नंदाबाईच्या मदतीने

करून घेतले होते .संध्याकाळची वेळ होती ,ती चकल्या तळत होती मदतीला नंदाबाई होतीच .बाहेर गेटचा आवाज आला .तिचे मिस्टर समीर आले होते . ती त्यांना सामोरे जात म्हणते,


 "आज लवकर आलात ?" सुधाची फिरकी घेत समीर म्हणाले, "बायकोच्या हातच्या गरमागरम चकल्या खायला आलो लवकर .अजुनही तुझ्या हाताला तिचं चव आहे ."


"अहो ,नंदाबाई आहेत आत .फ्रेश होऊन या .देतेच तुम्हाला चकल्या .झाल्या ,थोड्याच तळणे बाकी आहेत ."सुधा

नंदाबाई काम संपवुन निघून गेल्या .समीरसाठी सुधाने चार पाच चकल्या डिश मध्ये ठेवल्या .एक तुकडा तोंडात टाकत समीरच्या तोंडून निघून गेले,


"एकदम मस्त - - ! पण तुला त्रास होत असतानाही इतकी दगदग का करतेस - -? उगाच बिमार पडली तर - - -?" समीर


"अहो ,त्रास कसला त्यात आपल्या लेकरांसाठी आपण नाही करायचे तर कोण करणार ?अमितला आवडते हे सर्व आणि तुमची लाडकी स्कॉलर सुन - - ! तिला काही हे जमत नाही .तशी ती खूप प्रेमळ आहे .पण जॉब मुळे तिला काही करता येत नाही ना- ? मला तरी नेहमी कुठे काम असतात .हे दिवाळीचे दोन चार दिवस होते दगदग - - " सुधा


सुधाचा उत्साह बघुन समीरला कसा विषय काढावा हेच कळत नव्हते .पण सांगणे तर भाग होते.


"अगं ,सुधा ,अमितचा दुपारी कॉल होता ."समीर "काय म्हणत होता ? त्याच फ्लाईट चे बुकींग आहे ना ?की ट्रेन नी येतोय - -?" सुधा


 सुधाचा हिरमोड कसा करावा हेच समीरला कळत नव्हते .तरीही समीर म्हणाला, "त्या दोघांनी बुकिंग कॅन्सल केले ."

"का - ? म्हणजे अमित आणि माया दिवाळीला येणार नाहीत - -?"सुधा


" नाही ,मायाची कसली तरी एक्साम आहे ,दिवाळी नंतर लगेच .इकडे आली तर तिचा अभ्यास होणार नाही .अमित म्हणाला आईला तुम्हीच समजून सांगा . माझी हिम्मत नाही .तिचा खूप हिरमोड होईल ." समीरने एका झटक्यात सर्व सांगुन टाकले .


"वर्षातून एकदा तर येतात .त्यातही ही नाटकं ?जाऊ दया आपलं नशीब " असे म्हणुन सुधा कामाला लागली .पण तिच्यातील तो उत्साह क्षणात संपला होता .

    दिवाळीच्या दिवशी अमित आणि मायाने मुद्दाम विडिओ कॉल केला .सुधाला दोघांचाही राग आलेला होता पण आईची माया वेगळीच - - ! ती लेकरांवर कसा राग धरेल .मायाने अगदी गोड शब्दांत सुधाची

समजूत काढली .सुधाला मायाचे गोड बोलणे कशासाठी आहे हे कळत होते .तिने दोघांना दिवाळीच्या शुभेच्छा देवून कॉल संपविला .डोळ्यातील पाणी पुसत ,लक्ष्मी पूजन केले .घरातील एकुलत्या एका मुलगा आणि सुनेशिवाय - .

      दिवाळी संपली .तिळ संक्रांत आली .आली तशी गेली .होळी आली ,ती कोरोना घेऊन .सर्वत्र

भीतीचे वातावरण - - ! लॉक डाउन .अमितचे रोज कॉल सुरू,

"आई काळजी घे ."

"हो ,रे बाळा आम्ही घेतो काळजी .तुम्ही सांभाळून रहा ."सुधा

    सुधाला वाटते होते दोन चार महिन्यात सर्व ठिक होईल पण कसले काय ? ठाण मांडून बसलेला कोरोना हटता हटेना .उन्हाळा संपला पावसाळा गेला पुन्हा दिवाळी आली .ती पण आली तशी गेली .या

दिवाळीत समिरनेच अमितला येऊ नकोस म्हणुन सांगितले होते .

   जानेवारी महिन्यात अमितचा कॉल आला, "आई ,आता परिस्थिती ठिक आहे .मी जसे जमेल तसे येऊन जातो ."

  सुधाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले .पण ते फार काळ टिकले नाही .काही दिवसातच बातमी आली पुन्हा

लॉक डाउन ची .सुधाची तब्बेत ठिक राहत नव्हती . अंग गरम व्हायचे .खण्यापिण्यावरची वासना उडाली

होती .समीर घाबरला .अमितच्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने सर्व टेस्ट करून घेतल्या .सर्व नॉर्मल होते .शेवटी कोरोनाची टेस्ट केली .ती पण negative आली .काय करावे समीरला सुचत नव्हते .सुधाची

तब्बेत सुधारायचे नाव घेत नव्हती .डॉक्टर बदलून झाले पण फायदा नाही झाला .शेवटी एक दिवस नंदाबाई म्हणाल्या ,

"साहेब ,अमित आणि माया आल्याशिवाय बाईची तब्बेत काही सुधारणार नाही ."

   समीरच्या डोक्यात एकदम प्रकाश पाडला .अमितला कॉल केला म्हणाला, "अमित आता तुच तुझ्या आईचा डॉक्टर होऊ शकतो. तुला कसे जमते ते तू पहा .मी माझ्या परीने सर्व केले

पण नाही जमले ."  अमित काय समजायचे ते समजला .त्यालाही आई बाबांच्या भेटीची ओढ लागलीच होती . मायाला म्हणाला,

"मी महिन्याची सुट्टी टाकून आईकडे जात आहे .तुझे तू बघ .तुला सुट्टी मिळते की नाही ."

   मायाला वर्क फ्रॉम होम ची परमिशन मिळाली . अमितने विशेष परवानगी घेतली .दोघांची तिकिटे

बुक केले .आई,बाबा कडे आले .आल्यावर ते काही दिवस वेगळे राहिले .कोरोनाची काहीच लक्षणे नाही

दिसल्यावर घराय वावरू लागले .सुधाची आणि अमितची गळा भेट झाली .सुधाच्या डोळ्यातून कीती

वेळ अश्रू वाहत होते .त्या अश्रूंसोबतच तिची दुखणे वाहुन गेली होती .

माय लेकातील विरह संपला होता . त्याच्या आनंदात माया प्रेमाने सामील झाली होती .हे दृश्य बघुन समिरच्याही डोळ्यात नकळत पाणी आले .


Rate this content
Log in