Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.
Read a tale of endurance, will & a daring fight against Covid. Click here for "The Stalwarts" by Soni Shalini.

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

विक्रम वेताळ...

विक्रम वेताळ...

2 mins
299


आधुनिक काळातील विक्रम वेताळ....!


आधुनिक काळातील विक्रम वेताळ म्हंटले की अनेक विचार मनात थैमान घालतात आणि पूर्ण वाचनात आलेल्या विक्रमवेताळाच्या गोष्टी आठवतात. आमच्या बालपणी चांदोबा मासिक मिळायचे.ते खूप सर्वांना आवडायचे.त्यातील अनेक गोष्टी अजूनही स्मरणात आहेत.त्यातच विक्रम वेताळ ही क्रमशः चालणारी गोष्टीची मालिका आम्ही नियमित पणे वाचायचो आणि मनमुराद वाचनाचा आनन्द लुटायचो.आजही त्या गोष्टी आठवल्या की आमच्या वाचन संस्कृती जपणाऱ्या बालपणाचे कौतुक वाटते.आता काळ बदलला आणि डिजिटल क्रांतीमुळे वाचनाचे मापदंड बदलले. कथानकांचे स्वरूपही बदलले. एकाग्र चित्त वाचनाने मिळणारा आनंद हा एक वेगळाच असायचा.

रात्रीच्या पदभ्रमंतीत विक्रम राजाच्या मानगुटीवर वेताळ येऊन बसायचा आणि सारी रात्र गोष्ट सांगत सांगत मार्गक्रमण करायचा. सरते शेवटी राजाला प्रश्न विचारून राजाकडून योग्य उत्तराची अपेक्षा करायचा,उत्तर मिळाले नाही की परत झाड्सवर जसुन बसायचा. असे वर्षानुवर्षे चालत राही,राजाला काही योग्य उत्तर देत यायचे नाही आणि वेताळाला काही बंदिवान करता यायचे नाही. त्यामुळे मालिकेचे कथानक असेच मारुतीच्या शेपटी प्रमाणे वाढत जायी.

सध्याच्या युगात तसेच काहीसे चित्र राजकारणामुळे आपल्याला पहायला मिळते.प्रश्न तेच पण उत्तर काही सापडत नाही.उदाहरणार्थ सांगायचे झाले तर सर्व सामाजिक पाण्या पासून ते शेतकरी कर्ज माफीपासूनचे सारे वर्ष वेताळाच्या गोष्टी प्रमाणेच उत्तर हीन झालेले आहेत.आणि राजा कोणीही असला तरी गल्लोगल्ली वेताळ मात्र भरपुर आहेत,तेच कोट प्रश्न सोडवता येऊ नये याची बेजमी करून ठेवतात आणि मग नित्य वेताळ नामानिराळा राहतो इतके मात्र खरे...


गोष्टी अनेक समाजात

प्रश्न उभे करती अतोनात

उत्तर त्याचे कधी

राजास न मिळे असता बुडाशी वेताळ..

ढपळा बहाद्दर गल्लोगल्ली

गोष्टी अनेक सांगत फिरती

राजास उगा वाटते

का प्रश्न तेच तेच निर्मिती...

उत्तरावीण राजा पुन्हा

तीच तीच गोष्ट ऐकुनी राज्य चालवी

म्हणे मनाशीच पुन्हा पुन्हा

फुटेल कधीतरी नवी पालवी...


Rate this content
Log in