MOHIT DHOLE

Others

2  

MOHIT DHOLE

Others

वाट बघतोय मी! एक कलावंत

वाट बघतोय मी! एक कलावंत

3 mins
331


नमस्कार मंडळी... रामाला १४ वर्ष वनवास झाला नंतर राज्याभिषेक झाला. मला १८ वर्ष पूर्ण होत आहे पण माझी मुहूर्तमेढ केव्हा होईल देवच जाणे...


काय हवं असतं हो एका कलावंताला! एक व्यासपीठ, एक आडवा होत जाणारा पडदा, प्रेक्षकाचा उत्साह आणि भरगच्च टाळ्यांचा कडकडाट. आनंद उत्सव असतो हो तो आमच्यासाठी. आमचा आनंद सोहळा असतो! आमचा प्रेक्षक आमचा आम्हाला करावा लागतो. प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर होणाऱ्या बदलाबद्दल जसे स्थिर, गंभीर, हास्य हे आमच्या कलावंताला पुरस्कारापेक्षा काही कमी नसतो.


एक हास्याची लहर दिसण्यासाठी कलावंताला खूप मेहनत करावी लागते. मी कधी जोकर बनतो तर कधी भयंकर असा खलनायक तर कधी गोपिकांच्या अवतीभवती फिरणारा श्रीकृष्ण, तर कधी विसरभोळा मास्तर तर कधी व्यासपीठाला अगणित प्रसिद्धी देणारा नटसम्राट.


कलावंताला वेगवेगळ्या पात्रांनी ओळखले जाते. पिंजरा चित्रपटातील डॉ. श्रीराम लागू यांची मास्तरची भूमिका... आजही प्रेक्षकांना चित्रपटातील तो मास्तर लक्षात आहे. कलावंताल योग्यरित्या भूमिकेला न्याय देता आला पाहिजे. भरत जाधव असा एक कलावंत जो की नाटकात साक्षात विविध प्रकारच्या भूमिका प्रेक्षकांसमोर मांडतो. सही रे सही नाटकात त्यांनी रेखाटलेल्या विविध भूमिकांसाठी या कलावंताला साष्टाग नमस्कार! 'गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी' शब्द कानावर पडले तर भरत जाधव आठवल्या शिवाय राहणार नाही.


नाटक, सिनेमा समाजाचा आरसा असतात. नाटक सादर करताना विषय पण खूप महत्वाचा असतो. नाटकामुळे समाजात काही बदल होत असेल तर अशा प्रकारचे नाटक सतत सादर व्हावे. आज रोजी शेतकरी आत्महत्या, स्त्री भृणहत्या, महिला सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, देशभक्ती, इत्यादी विषयावर नाटक सादर व्हावेच. बदल घडवावा लागेल त्यासाठी कलावंताला पात्र यथोचित रेखावेच लागेल.


शेतकरी आत्महत्यांवर नाटके सादर करता आलीच पाहिजे. मला माझ्या बहिणीला वाचवता आले पाहिजे. महिला सुरक्षेबद्दल जनजागृती करता आलीच पाहिजे. माझ्या शहराची शांत शहर म्हणून ओळख होती ती पुन्हा देता आली पाहिजे. नको ते वादविवाद नको त्या मारामाऱ्या, नको ते खून आणि होणाऱ्या लुटमार आणि चोरीच्या घटना. अभिनयाच्या माध्यमातून मला जे बदल घडवता येईल त्यासाठी माझा प्रयत्न असेल. ते व्यासपीठ माझे असेल आणि मी त्याचा.


खूप मेहनत करील वेगवेगळ्या भूमिका लोकांसमोर मांडेल आणि नाट्यक्षेत्रात शहरवासियांना एक नवी दिशा देईल. वाट त्याचीच असेल की, केव्हा एकदा नाट्यगृह सुरु होईल.


एका बालनाट्य स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून बोलाविले होते. वेगवेगळ्या शाळांनी नाटके सादर केली. आयोजन अप्रतिम. शिक्षक-विद्यार्थी समवेत नाटके घेवून आली होती. एकमेकांची तयारी बघता स्पर्धा चुरशीची होईल असा सगळ्यांचा अंदाज. मला स्वत:ला पण नाटक बघण्याची आतुरता झाली. परीक्षक म्हणून होतो पण माझीच परीक्षा होती. कोणता कलाकार उत्तम तसेच कोणते नाटक उत्तम यावर डोळे दिपवून बसायचे होते.


स्पर्धा चालू होण्यापासून तर बक्षीस समारंभापर्यंत एक अविस्मरणीय असा हा कार्यक्रम. मला वेगवेळ्या भूमिकेतले वेगवेगळे नट पाहायला मिळाले. नाट्यक्षेत्रातसुद्धा आपले शहरवासीय बाल कलावंत कुठेच कमी नाही हे दिसले. या सगळ्या बालकलाकारांना एक नाट्यगृह तर नक्कीच मिळायला पाहिजे.


स्नेह संमेलनात शाळा, महाविद्यालयातले विद्यार्थी विविध नाटके सदर करतात. एखादी कुठली तरी स्पर्धा असली की त्यामध्ये भाग घ्यायचा, बक्षीस जिंकायचे आणि तिथेच कुठेतरी कलावंताला पूर्णविराम मिळतात. नाट्यक्षेत्रातसुद्धा कलावंताला आयुष्य घडविण्याची संधी द्यावी याकरिता माझा हा प्रयत्न. एक कलावंत मी वाट बघतोय की केव्हा एकदा नाट्यगृह सुरु होईल.!


Rate this content
Log in